सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्यातर्फे संगमनेर मध्ये 500 बेड चे कोविड सेंटर
By Admin
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्यातर्फे संगमनेर मध्ये 500 बेड चे कोविड सेंटर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 20 एप्रिल 2021
राज्यात आलेली कोरोना ची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यातील इतर सहकारी साखर कारखानदारानी कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. अशी मागणी कारखाना ऊस सभासदाकडून होत आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राय पातळीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असून जिल्ह्यातील व तालुक्यातील कोरोना पूर्णपणे रोख ण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सातत्याने सूचना केल्या आहेत.त्याचबरोबर नागरिकांनी शासनाचा लॉग डाऊन अत्यंत कडक रीतीने पाळणे गरजेचे असून त्यामुळे कोरोणा चा प्रादुर्भाव रोखणार आहे.मात्र सध्याची रुग्ण वाढ व त्या वरील उपाय योजनांमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे नवीन ५०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज च्या अमृत कलामंच येथे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर शहर व तालुक्याती ल प्रशासकीय व आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.
या बैठकीत थोरात यांनी कारखा न्याला नवीन कोवीड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार नगर रोड वरील विघ्नहर्ता पॅलेस या ठिकाणी कारखान्याच्या वतीने पुरुषांसाठी स्वतंत्र ३०० बेड व महिलांसाठी स्वतंत्र २०० बेडचे असे एकूण ५०० बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू होत आहे.तालुक्यातील आपत्तीच्या वेळी अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांनी सातत्याने मदतीची भूमिका घेतली असून मागील वर्षी कोरोना संकटात विविध ठिकाणी कोवीड केअर सेंटर सुरू केले होते. याचबरोबर मोफत अन्नछत्र ही सुरू केले होते.सध्याचा वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहतात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखानास बाळासाहेब थोरात यांनी ५०० बेडचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.यानुसार अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ,उपाध्यक्ष संतोष हासे,सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी तातडीने नवीन रोडवरील विघ्नहर्ता पॅलेस या ठिकाणी कोविड केअर सेंटर साठी अद्ययावत सुविधा देण्याच्या कामास सुरुवात केली आहे.हे कोवीड केअर सेंटर तातडीने सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची सोय होणार
आहे.सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात आले असून संस्थात्मक विली करण्याला प्राधान्य दिले जात आहे.यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,३० एप्रिल पर्यंत सर्वांनी अत्यंत कडक पद्धतीने लॉग डाऊन पाळला तर कोरोणचा प्रादुर्भाव आपण करू कमी करू शकतो.तालुका कोरोणा मुक्तीकडे नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त बाळगिणे बरोबर प्रशासनानेही कडक शिस्त लावावी असे आवाहन केले आहे.कारखान्याच्या या निर्णया मुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून ही हे कोरोणा सेंटर तातडीने सुरू करण्यासाठी कारखान्याच्या वतीने काम सुरू करण्यात आले आहे.