दु:खद! सोळा कोटीचे इंजेक्शन देऊनही वेदिकाचा मृत्यू, उपचारांसाठी आईवडीलांनी केलं होतं जीवाचं रान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आपल्या लेकीला दुर्धर आजारातून बरे करण्यासाठी भोसरी येथील वेदीकाच्या आई वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सोळा कोटीचे इंजेक्शनही दिले. मात्र आज अचानक त्रास होऊ लागक्याने वेदिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे वेदिकाने अखेरचा श्वास घेतला. मुलीला वाचविण्याचे सौरव शिंदे यांचे प्रयत्न निरर्थक ठरले.
भोसरीतील वेदीकाचे वडील सौरव शिंदे, आई व आजोबांनी उपचारासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन बाहेर देशातून मागवण्यासाठी मदतीचे आवाहन काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यांच्या आवाहनाला साद देत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व सर्वच थरातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला. वेदीकासाठी शिरूर चे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनीही तिची कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी व मदतीसाठी लोकसभेत आवाज उठवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकार ला मदतीचे आवाहन केले होते. व त्या इंजेक्शनची कस्टम ड्युटी माफ करून घेतली.
त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. १६ कोटी लोकवर्गणीतून जमा झाली. इंजेक्शन भारतात आले. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर इंजेक्शन देऊन पुढील उपचार घेऊन वेदिका पूर्ण बरी होऊन घरी आली होती. सगळे व्यवस्थित सुरू आहे असे वाटत असतानाच आज काळाने वेदीकवर झडप घातली.मात्र रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास झाला. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा निरोप घेतला.