कासार पिंपळगावमध्ये जनरल स्टोअर्स दुकानात धाडसी चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे जिल्हा परीषद प्राथमिक शाळा समोरील जनरल स्टोअर्स व किराणा दुकानात धाडसी चोरी रविवारी राञी (दि.२) दुकानाच्या मागच्या बाजूचे शेटरचे कुलुपाचे लाॕक तोडून चोरी झाली आहे.दुकानदार बाळू पगारे यांनी सकाळी नेहमी प्रमाणे दुकान चालू करण्यासाठी गेले असता दुकानात प्रवेश केला असता दुकानातील झेराॕक्स केरोसिया कंपनीचे छपाई मशिन असलेल्या जागी दुकानात दिसले नाही.तसेच दुकानाच्या मागच्या बाजूचे शटर लाॕक तोडल्याचे दिसून आले.दुकानातील सौंदर्य प्रसादने वस्तू तसेच किराणा दुकानही असल्याने खाद्य तेलाचे डबे असे एकूण 60 हजार रुपयाचे दुकानातील साहीत्य चोरी गेले असल्याची माहीती दुकानदार बाळू पगारे यांनी दिली.चोरी झालेल्या दुकानशेजारी अनेक दाट लोक वस्ती असून इतर दुकानेही आहेत.तसेच पाथर्डी-मिरी कडे जाणारा रस्ता असल्याने राञी अपराञी वाहने चालू असतात.
पाथर्डी पोलिस स्टेशनचे अधिकारी बिट हवालदार श्री .तांबे घटना स्थळी दाखल होवून झालेल्या घटनेचा पंचनामा केला आहे.तसेच अधिकृतपणे पाथर्डी पोलिस तपास करत आहेत.