आरोग्य विभागातील परीक्षेदरम्यान अहमदनगरमध्ये उघडकीस आला हा धक्कादायक प्रकार, तिघांना केली अटक !
अहमदनगर- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या 'क' वर्ग पद भरतीमध्ये डमी विद्यार्थी आढळ्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. नगर शहरातील प्रेमराज सारडा महाविद्यालयात हा प्रकार उडला आहे.
मुळ परीक्षार्थी, त्याच्यासाठी एक डमी, या दोघांना मदत करणारा एक व्यक्ती, अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एक मोटरगाडी जागा घेतली आहे.
त्यातून सुमारे एक लाख रुपयांची रक्कम जप्त केली. काही तांत्रिक साधने सुद्धा पोलिसांना या मोटरगाडीमध्ये आढळले आहेत.
त्यामुळे पेपर लीक केल्याचेही शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाचे हे पेपर होण्यासाठी एका खासगी एजन्सी च नेमणूक करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने देण्यासाठी खाजगी एजन्सीकडे बोट केले आहे.
खाजगी एजन्सीने मात्र आरोग्य विभागाने व्हावे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अजूनही फिर्याद दाखल झाली नव्हती.