अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी ही नावे जोरदार चर्चेत
अहमदनगर- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी ६ मार्च रोजी संचालक मंडळाची सभा बोलविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्या सूचनेनुसार संचालकांना शुक्रवारी सायंकाळी सभेची विषय पत्रिका पाठविण्यात आली आहे.
अध्यक्ष पदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नाव आघाडीवर आहे असे बोले जात तर माजी आमदार राहुल जागताप यांचेही नाव समोर येत तर उपाध्यक्ष पदासाठी आमदार मोनिका राजळे यांचे नाव चर्चेत आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्य निवडीसाठी बँकेच्या स्व. मारुतराव घुले पाटील सभागृहात ६ मार्च रोजी दुपारी १ वाजता सभा होणार आहे.
विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी नवनिर्वाचित संचालकांची नावे असलेली अधिसूचना जारी केली. नवनिर्वाचित संचालकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर केली आहे. येत्या शनिवारी ही सभा होईल. सभेचे पीठासन अधिकारी म्हणून आहेर हे काम पाहतील.
जिल्हा बँकेत २१ संचालक हे विविध मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनाच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असतो.