भरधाव वाहनाच्या धडकेत विद्यार्थी ठार;एक गंभीर जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अभ्यासासाठी नोटस्ची झेरॉक्स काढून येताना भरधाव वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने नर्सिंग कॉलेजचा अभिषेक राजेंद्र कासुळे (वय 21, रा.
भालगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हा विद्यार्थी जागीच ठार झाला; तर ओंकार संदीप गावंडे (वय 22, रा. सातारा, सध्या रा. दोघे बोरपाडळे, ता. पन्हाळा) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला.
हा अपघात सोमवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान कोडोली- बोरपाडळे रस्त्यावर घडला. बोरपाडळे येथील नर्सिंग कॉलेजमधील दुसर्या वर्षामध्ये अभिषेक कासुळे शिकत होता. त्याच्याच वर्गातील ओंकार गावंडे हे दोघे कोडोली येथून झेरॉक्सच्या प्रती काढून परतत असताना हा अपघात झाला.
कोडोली-बोरपाडळे रस्त्यावरील शिवम हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामुळे अभिषेक व ओंकार हे दोघेजण सुमारे 30 फूट रस्त्यावरून फरफटत गेल्याने अभिषेक डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाला.