शेवगाव- गर्भवती महीलेचा टेम्पो-मोटारसायकल अपघातात मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर झालेल्या टेम्पो-मोटारसायकल अपघातात रोहिणी गर्जे (वय १९ वर्षे) रा.वडुले या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज मंगळवार दि.१९ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबद अधिक माहिती अशी की, रोहिणी गर्जे या आपल्या सासऱ्या सोबत कुकाणा येथे दवाखान्यात गेल्या होत्या.कुकाण्यातून मोटारसायकल वरून घरी जात असताना चिलेखनवाडी गावा जवळ नेवासा-शेवगाव रस्त्यावर सदर मोटारसायकलला पाठीमागून आलेल्या एम एच ०४-डी के - ८१९१ या ४०७ टेम्पोची मोटरसायकलला जोराची धडक लागून झालेल्या अपघातात टेम्पोची चाक डोक्यावरून गेल्याने वडूले येथील १९ वर्षीय गर्भवती महीला रोहिनी गणेश गर्जे ही जागीच ठार झाली असून तीचे सासरे रामदास हरिभाऊ गर्जे हे जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच कुकाणा पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार नितीन भताने, तुकाराम खेडकर व पो. कॉ. अमोल साळवे हे घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावर वडुले येथे रात्री उशिरा मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.
याबाबद रामदास हरिभाऊ गर्जे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून टेम्पो चालक नामे परमेश्वर हाऊसराव आमले रा.आंभोरा, ता.आष्टी याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.