महाराष्ट्र
944
10
निर्णय घ्या, वाटल्यास पुन्हा गुवाहाटीला जावू; बच्चू कडू यांचा थेट इशारा?
By Admin
निर्णय घ्या, वाटल्यास पुन्हा गुवाहाटीला जावू; बच्चू कडू यांचा थेट इशारा?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले बच्चू कडू यांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळालेलं नाही. त्यातच आमदार बच्चू कडू विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. कडू यांनी सरकारच्या शेतकऱ्यांसंदर्भातील धोरणावरून जोरदार टीका केली आहे.
तसेच मंत्रीपद मिळणार म्हणून गप्प राहू का, असा सवालही कडू यांनी उपस्थित केला. (Bachhu Kadu news in Marathi)
बच्चू कडू म्हणाले की, पावसाने जेवढं झालं नाही त्यापेक्षा जास्त सरकारच्या धोरणामुळे नुकसान होतय. प्रश्न तेच आहेत. सत्त बदलली की, चेहरे बदलतात. आमचे धोरणे चुकीचे होते. स्वामीनाथ आयोग लागू केला असता तर शेतकरी आत्महत्या ५० टक्क्यांनी कमी झाल्या असत्या, अस म्हणत बच्चू कडू यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधला.
बच्चू कडू पुढं म्हणाले की, मी कोणत्या पक्षाचा हे महत्त्वाचं नाही. भाजप-शिवसेनाला पाठिंबा दिला म्हणजे मी शेपटी हालवायची हा विषय महत्वाचं नसल्याचं कडू म्हणाले. कष्ट करणारा आमचा शेतकरी आहे. त्याच्या हाती येत काय? तूर खरेदी केली नाही? धान उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला. अतिवृष्टी आली ते वेगळं. ते दिसतं. पण तुम्ही आम्ही शेतकऱ्यांना कसायासारखे कापतो. आम्ही सगळेच नालायक आहोत. आम्ही जखमेवर मीठ टाकणाऱ्यांची औलाद आहोत, असं म्हणत पावसाचं नाव बदनाम करतोय, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.
एखाद्याला घर द्यायचं तर सर्व्हे होतो. काँग्रेस आणि भाजपच्या काळात हेच झालं. आम्ही पण त्यांच्यासारखेच आहेत. कारण आम्ही पाठिंबा देतोय. मी शेतकऱ्यांच्या बाजुने बोलू की नको. मी बोललो तर माझा राग होईल. मला परवा नाही. चुलीत घाला ते मंत्रीपद. झेंडा घेऊन थोडीच निवडून आलो. माझी स्वत:ची पानटपरी असल्याचं म्हणत, कडू यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला.
दरम्यान रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढण्यावरून बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ते रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढवा. विधवा भगिणी असो वा अपंग बांधव यांना रोजगार हमी योजनेत आणण्याचा निर्णय घ्या. वाटलस पुन्हा एकदा गुवाहाटीला जावू. लावा छातीला माती, असंही कडू यांनी म्हटलं. अर्थात बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्याचा सल्ला दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)