दादापाटील राजळे महाविद्यालयात स्व. रमेश देव, लता मंगेशकर, बप्पी लहरी यांना आदरांजली
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात फिल्म क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांच्या तर्फे स्व. रमेश देव, स्व. भारतरत्न लता मंगेशकर व स्व. बप्पी लहरी यांना आदरांजली वाहण्यासाठी दि. २२ फेब्रुवारी रोजी " स्वरांजली" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमा मध्ये मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील या महान कलाकारांची लोकप्रिय गाणी ध्वनिक्षेपित करून आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, फिल्म क्लबचे प्रा. राजू घोलप, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आसाराम देसाई, प्रा. डॉ. सुभाष देशमुख, प्रा. डॉ. किशोरकुमार गायकवाड, प्रा. धनेश्वरी म्हस्के, प्रा. ज्योती तुपे, प्रा. चंद्रकांत पानसरे प्रा. योगिता इंगळे, प्रा. शितल बावस्कर, प्रा. डॉ. ज्ञानदेव कांडेकर, डॉ.राजकुमार घुले, प्रा. नितीन भिसे, रवींद्र फलके आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतुलकुमार चौरपगार तर आभार प्रा. अस्लम शेख यांनी केले.