आदर्श कलाशिक्षक सन्मानित मिलिंद गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथील व आदिनाथ नगर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये कार्यरत असलेले शिक्षक मिलिंद गायकवाड यांना कला साधना सामाजिक संस्था, नवी मुंबई च्या वतीने नुकताच आदर्श कलाशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने आल्हणवाडी ग्रामस्थांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
आल्हणवाडी येथे नियोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांच्यावतीने गायकवाड यांचा सरपंच मनिषा कर्डिले व उपसरपंच परमेश्वर गव्हाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी रामेश्वर कर्डिले, राधाकृष्ण कर्डिले, अजय औटी, स्वाभिमान संघटनेचे बाळासाहेब कर्डिले, चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदाम कांबळे (पुणे), साहिल गायकवाड, धनंजय कर्डिले, उमेश गव्हाणे, पप्पू गव्हाणे, आदिनाथ चावक, किशोर झांबरे, अनिल कर्डिले, दयानंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णासाहेब फुंदे यांनी केले तर आभार ग्रा.पं. सदस्य भाऊसाहेब कर्डिले यांनी मानले.