महाराष्ट्र
समृद्धी महामार्गावर काळवीट कळप आडवा गेल्याने गॅसची ट्रक पलटी
By Admin
समृद्धी महामार्गावर काळवीट कळप आडवा गेल्याने गॅसची ट्रक पलटी
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
महामार्गावरून एचपी कंपनीच्या गॅसच्या टाक्या घेऊन जात असलेल्या ट्रकला काळवीट आडवे आल्याने सुरक्षा कठडे तोडून ट्रक थेट महामार्गावरून खाली पडली.
अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक चालक आयुब शेख (रा.शिवपुर ता. वैजापूर) हा रात्री औरंगाबाद येथून ट्रकमध्ये गॅसने भरलेल्या टाक्या घेऊन अमरावतीच्या दिशेने निघाला होता. ही ट्रक वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील केनवड गाव परिसराच्या हद्दीत आली तेव्हा पहाटे चार वाजता अचानक काळवीटांचा कळप ट्रकला आडवा गेला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या कडेला लावलेले सुरक्षा कठडे तोडून ट्रकची पलटी होऊन ती रस्त्याच्या कडेला पडली. यावेळी ट्रकमधील सर्व टाक्या खाली पडल्या होत्या. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मुख्य सुरक्षा रक्षक एस.एस. चिमुकले व सुरक्षा रक्षक गणेश सोनुने घटनास्थळी दाखल झाले.
सुरक्षा प्लेटचे नट-बोल्ट गायब
समृद्धी महामार्गाच्या कडेला सुरक्षेसाठी जाड पत्र्याच्या प्लेट बसविण्यात आलेल्या आहेत. अपघात झाला त्या ठिकाणी मात्र अनेक प्लेटचे नट बोल्ट गायब होते. त्यामुळे ट्रक या प्लेट तोडून थेट खाली गेल्याचे चालक शेख यांनी सांगितले.
चालकाला गुंगी लागल्याने ट्रक उलटला
चालकाला गुंगी लागल्याने डिव्हायडरच्या खड्ड्यात ट्रक उलटला. सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झाले नाही. चालक धीरज बांगर (रा. बीड) हा नागपूर येथून ट्रकमध्ये पोल्ट्री फार्मचे खाद्य घेऊन बारामतीकडे जात होता. पहाटे पाच वाजेच्या सुमारास पिंपरी माळी परिसरात ट्रक आली तेव्हा चालकाला गुंगी लागल्याने हा अपघात घडला.
कारचा टायर फुटल्याने वऱ्हाडी अडकले महामार्गावर
जालना येथून नागपूरला लग्नाला निघालेल्या वराडींच्या कारचा टायर समृद्धी महामार्गवरील धामणगाव (जी.अमरावती) परिसरात फुटला. कारमधील स्टेपनीही अडकल्याने टायर बदलता आला नाही. त्यामुळे पाच तास हे वर्हाडी महामार्गावरच अडकून पडले होते. शेवटी त्यांनी थेट गाडीचे चाक खोलून अमरावती येथे नेले.
Tags :
45974
10