महाराष्ट्र
पाथर्डी- नव्या ग्रीन फील्ड 'एक्सप्रेसवे'साठी जानेवारीपासून होणार भूसंपादन
By Admin
पाथर्डी- नव्या ग्रीन फील्ड 'एक्सप्रेसवे'साठी जानेवारीपासून होणार भूसंपादन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पुणे - नगर - संभाजीनगर असा नवा एक्सप्रेसवे तयार होणार असून 260 किलोमीटरचा हा नवा एक्सप्रेस राहणार आहे. यात नगर जिल्ह्यात 123 किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे राहणार आहे. नगर जिल्ह्यातील, नगर, पारनेर, श्रीगोंदे, पाथर्डी, शेवगाव या पाच तालुक्यांचा समावेश राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकार्यांच्या यापूर्वीच नियुक्ती झाल्या होत्या. संभाजीनगर जिल्ह्यातील नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. नगर जिल्ह्यात औरंगाबादनंतर शेवगावपासून या एक्सप्रेस वेला सुरुवात होणार आहे.
शेवगाव, पाथर्डी, नगर, श्रीगोंदेमार्गे पारनेरकडून हा एक्सप्रेसवे जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन अधिकार्यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील भूसंपादनासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील भूसंपादनासाठी पारनेर प्रांताधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाथर्डी तालुक्यासाठी पाथर्डी प्रांतांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवगाव तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नगर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या पंधरा दिवसांत या एक्सप्रेसवे साठी अधिसूचना जारी होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पुणे-नगर-संभाजीनगर या नव्या ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे'साठी महसूल विभागाकडून नगर जिल्ह्यातील भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकार्यांच्या नियुक्त्या झाल्या असून, पुढच्या पंधरा दिवसात अधिसूचना जारी होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात भूसंपादनापूर्वी मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पुढच्या तीन वर्षात हा एक्सप्रेसवे पूर्ण होऊन नगरकरांचा पुण्याचा प्रवास सुखकर होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच या संदर्भातली घोषणा नागपूर येथे केलेली होती त्याची अंमलबजावणी आता एक प्रकारे सुरू होणार हे आता निश्चित झालेले आहे. त्यामुळे आता नगर सोलापूर पाठोपाठ आता पुणे संभाजीनगर अशा या रस्त्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे तर दुसरीकडे याच जिल्ह्यातून सुरत ते हैदराबाद असा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा तयार होत आहे. त्यामुळे आता नगर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे असे रस्ते आता या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्ते आता अधिक गतीने होणार आहे.
Tags :
45241
10