शेवगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकणातील पुरग्रस्तांना मदत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून पूरग्रस्तांसाठी मदत केली जात आहे. मराठी बंधू भगिनिंच्या संकट काळात नगर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष ठामपणे उभा राहिल. पुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोकणातली माणसांबरोबर आम्ही सुध्दा तयार आहोत. नगर शहर व शेवगाव तालुका मनसेतर्फे ४ हजार नागरीकांना पाणी, तांदूळ, रग, चादर, बिस्कीट, माचिस, मेणबत्ती, फरसाण आदी जीवनाश्यक साहित्य असलेला ट्रक भरून पाठविण्यात आला आहे, अशी माहिती नितीन भुतारे यांनी दिली. शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवने यांच्यामार्फत ही मदत पूरग्रस्त भागातील कोकणातील चिपळूण या ठिकाणी रवाना करण्यात आली. महाराष्ट्रातून येणाऱ्या हे सर्व नियोजन मनसेचे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या मार्फत सुरू आहे.
या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, अनिता दिघे, विनोद काकडे, संकेत व्यवहारे, अशोक दातरांगे, पोपट पाथरे, संकेत होसिंग, दिपक दांगट, गणेश शिंदे, गणेश मराठे, समर्थ उकांडे, देवीदास कुलट, तुषार हिरवे, शेवगाव तालुका मनसेचे गोकुळ भागवत, संजय वणवे, गणेश डोमकावळे, देविदास हुशार, संदिप देशमुख, विठ्ठल दुधाळ, संतोष शित्रे, अमोल शेळके, ओकांर दगडे आदी उपस्थित होते.