अपघातात एक तरुणी जागीच ठार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर कान्हूर पठारवरून टाकळी ढोकेश्वरकडे भरधाव वेगात जात असलेल्या डंपरची दुचाकीस्वारास जोराची धडक बसली. या अपघातात एक तरूणी जागीच ठार झाली असून तिचे वडिल गंभीर जखमी झाले आहे. आज, ३१ जुलै रोजी हा अपघात झाला आहे.
कान्हूर पठार वरून टाकळी ढोकेश्वरकडे भरधाव वेगात जात असलेल्या डंपरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील तरूणी संपदा सुरेश साळवे (वय-२५ ,रा.कान्हूर पठार) ही जागीच ठार झाली. तर तिचे वडिल सुरेश रतन साळवे (रा.कान्हुरपठार) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नगर येथे हलविण्यात आले. घटनेनंतर डंपर चालक पसार झाला असून संबंधित वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहनासह चालक मालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते. मृतांच्या वारसाला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.