बालमटाकळी ते कांबी रस्त्यासाठी केलेल्या जनशक्तीच्या आंदोलनाला यश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बालमटाकळी ते कांबी रस्त्यासाठी आज अनोखे स्वरूपाचे 'एकेरी वाहतूक बंद व महामार्गावर शाळा भरो आंदोलन' जनशक्ती विकास आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदा काकडे व बालमटाकळी ते कांबी रस्त्यावरील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
बालमटाकळी ते कांबी रस्त्यावर १५० हून अधिक कुटुंब वास्तव्य करतात. परंतु त्यांच्या वस्तीवर जाणे-येण्यासाठी रस्त्याअभावी प्रचंड हाल होतात. रस्त्यावर प्रचंड चिखल व पाणी असते. या त्रासाला कंटाळून काही मुलांनी शाळा सोडल्या तर काही शेतकऱ्यांनी आपली शेती पडीक ठेवली. रस्त्याअभावी अबाल वृद्धांना दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही.
बालमटाकळी ते कांबी रस्त्याचे काम त्वरित व्हावे या मागणीसाठी आज जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदा काकडे व अॅड.विद्याधर काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव-गेवराई महामार्गावर बालमटाकळी येथे "महामार्गावर शाळा भरो आंदोलन" व "एकेरी रस्ता बंद आंदोलन" करण्यात आले यावेळी जगन्नाथ गावडे, राजेंद्र पातकळ, संजय आंधळे, अशोकराव ढाकणे, लक्ष्मण पातकळ, गुलाबराव दसपुते, हरिभाऊ फाटे, माणिक गर्जे, अकबर भाई शेख, विजय लेंडाळ, राहुल लेंडाळ, विठ्ठल सौंदर, संतोष गंगाधर, गणेश गाडे, विक्रम गरड, सर्जेराव घोरपडे, मनोहर बामदळे, मनोज घोंगडे, नवनाथ खेडकर, बाळासाहेब नरके, रासपचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव लेंडाळ, बाबासाहेब मस्के, पोपट बागडे, विश्वास लेंडाळ, जगन्नाथ लेंडाळ, गंगा गरड, दुर्गाजी रसाळ, भाऊसाहेब राजळे, सौ.सविता लेंडाळ, सुवर्णा लेंडाळ, रेणुका बागडे, अंजली लेंडाळ, नीता लेंडाळ, जयश्री सौंदर, अलका काळे, सिंधु गंगाधर, रेश्मा पठाण यांच्यासह लेंडाळ वस्तीवरील सर्व पुरुष, महिला, शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी दोन ते अडीच तास रस्त्यावर शाळा भरून शाळकरी मुलांनी शिक्षण घेतले व शासनाचे लक्ष वेधले.