महाराष्ट्र
971
10
अंत्यविधीवरून वाद, 21 जणांवर गुन्हा दाखल
By Admin
अंत्यविधीवरून वाद, 21 जणांवर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
वक्फ न्यायालयाने प्रतिबंधित केलेल्या नेवासा बुद्रुक येथील नारद मुनी मंदिराजवळच्या जागेमध्ये दफनविधी करण्यावरून नेवासा बुद्रुक व नेवासा शहर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान सदरचा मृतदेहाला प्रशासनाचा निर्णय होपर्यंत अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आलेला आहे. मृतदेहाची अवहेलना केल्याबद्दल सुमारे ५० ते ६० जणांविरुद्ध पोलीस हवालदार वसीम मुस्तफा इनामदार यांनी जमावबंदी कायदा व जातीय तणाव वाढविल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
नेवासा बुद्रुक येथे पुराण प्रसिद्ध नारद मुनी मंदिर आहे. या मंदिराचा परिसर वक्फ बोर्डाच्या मालकीचा असल्याबद्दल न्यायालयात खटला सुरू आहे. यामुळे वक्फ न्यायलायच्या निर्णयानुसार स्थगिती आदेश दिलेला आहे. काल बुधवारी (दिनांक १७ ऑगस्ट) रोजी येथील बाबुलाल देशमुख यांचे निधन झाले. सदरच्या मृतदेहाचे वादग्रस्त जागेत दफन विधी करण्यासाठी गेले असता पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदरची जागा प्रतिबंधित असल्याने सदरचा दफन विधी करू नये अशी भूमिका घेतल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी थेट सदरचा मृतदेह हा नेवासा पोलीस स्टेशनलाच आणला व दफन विधी इथे करायचा नाही तर कुठे करायचा ? अशी भूमिका घेतली. यामुळे वाद सुरू झाला.
या प्रकारामुळे नेवासा परिसरामध्ये जातीय तणाव निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने पुढील निर्णय होईपर्यंत पहाटे सदरचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात हलवला. आज गुरुवार (दि.१८) रोजी दिवसभर वेगवेगळ्या अफवांमुळे नेवासा परिसरात तणावाचे वातावरण होते. सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे देखील नेवासा येथे आले. यांनी प्रकरणांमध्ये लक्ष घालून हिंदू – मुस्लिम समाजातील लोकांशी स्वतंत्रपणे संवाद साधला व मयताच्या नातेवाईकांना प्रशासनाने न्यायलायच्या आदेशाचा अर्थ समजून सांगितल्यानंतर त्यांना न्यायलायाचा निर्णय होईपर्यंत नेवासा बुद्रूक येथील गावठाण स्मशान भूमीत दफन विधी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. रात्री उशिरापर्यंत समाज बांधव व मयताच्या घरच्यांशी चर्चा सुरू होती.
यावेळी काल रात्री ११ पासून अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन शहरात तळ ठोकून होते. खबरदारीचा उपाय म्हणून राखीव सुरक्षा दलाच्या २ तुकड्या तसेच शेवगाव, शिंगणापूर, श्रीरामपूर, सोनई, पाथर्डी येथील पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचार्यांना बंदोबस्त कामी तैनात करण्यात आले होते.
यावेळी दोन्ही समाजातील समाज बांधवांना विश्वासात घेवून न्यायालयाच्या आदेशाची माहीती दिली. मात्र मयताच्या समाजातील लोकांनी तेथेच अंत्यविधी करण्याचा हट्ट धरल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली होती. रात्री याप्रकरणी उशीरापर्यंत ठोस तोडगा निघालेला नव्हता त्यामुळे पोलिस अधिकारी कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)