महाराष्ट्र
808
10
साकेगाव ग्रामसभेत अवैध दारु बंदी ठराव मंजूर
By Admin
साकेगाव ग्रामसभेत अवैध दारु बंदी ठराव मंजूर
गावात अवैध दारु विक्रीमुळे महिला संतप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी -
पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायतीच्या झालेल्या महीला ग्रामसभेत अवैध दारु बंदीचा ठराव (दि.17) सरपंच सुधाकर बळीद,उप सरपंच काकासाहेब सातपुते,ग्रामसेवक दिलीप मिसाळ तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य आप्पासाहेब सातपुते,संतोष चव्हाण, राजेंद्र सातपुते, चंद्रकांत सातपुते,रुक्साना शेख,व्दारका घुले,मनिषा धुमाळ, लक्ष्मीबाई सातपुते,रुथाबाई पटारे,मीरा एकशिंगे, मंदा सातपुते,सत्यभामा वांढेकर,अनिता सातपुते,सिता दुधाळ,मनिषा दुधाळ,वंदना सातपुते,पुष्पा दुधाळ,लक्ष्मी सातपुते,स्वाती दुधाळ
यांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आला.यावेळी गावातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
येथील ग्रामसभेत अजेंड्यावर असलेल्या विषयांचे वाचन येथील ग्रामसेवक दिलीप मिसाळ यांनी केले.
महिलांनी गावात संपूर्ण दारु बंदी करण्याची मागणी केल्याने हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.
यावेळी गावातील महिलांनी गावामध्ये अवैध दारु विक्री होत असलेली ती बंद करावी.कारण यामुळे गावातील तरुण तसेच पुरुष व्यसनाधीन झालेले आहेत.गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत.तरुणांना वाईट सवयी लागू नयेत.परीसरातील चितळी रोड,काळेगाव रोडवर,पागोरी पिंपळगाव रोड,पाडळी रोडवर अवैध दारुची दुकाने आहेत.ती दुकाने बंद करावीत असे गावातील महिलांनी ग्राम सभेत सांगितले.यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक गोरक्षनाथ सातपुते यांनी सांगितले की,अनेक महिलांचे संसार वाईट वळणावर असून काही पुरुष महीलांना दारु पिऊन घरी घेऊन ञास देत आहेत.असे यावेळी सांगितले.
यासाठी दारु बंदी ठराव महीलांनी केला आहे.तसेच महिलाची विशेष सभा झाल्याने गावातील पुरुष ग्रामस्थांची विशेष सभा झाली.
यामध्येही दारु बंदीचा ठराव संमत करण्यात आला.
गावात संपूर्ण दारु बंदीचा ठराव झाल्याने या बाबत शासन स्तरावर पाठपुरावा करु अशी प्रतिक्रिया ग्रामसेवक दिलीप मिसाळ यांनी दिली आहे.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)