अकोला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर मोहटादेवी जानपीर विकास पॅनलचे वर्चस्व
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अकोला विविध कार्यकारी सेवा संस्थेवर राष्ट्रवादी पुरस्कृत मोहटादेवी जानपीर विकास पॅनल ला भरघोस यश मिळून 13 पैकी 12 जागांवर यश मिळाले आहे. मा.प्रतापकाका ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान चेअरमन श्री सुखदेव गर्जे सर, माजी सरपंच अनिल ढाकणे, कृषितज्ज्ञ विजय पालवे , एकनाथ गर्जे सर, कृष्णा धायतडक, प्रदीप पालवे, अर्जुन धायतडक यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. विद्यमान चेअरमन श्री सुखदेव गर्जे सर यांचा पारदर्शक कारभार व शेतकरी हिताचे निर्णय यामुळे हे मोठे यश मिळाल्याचे गावातील जाणकारांनी सांगितले. मा प्रतापकाका ढाकणे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून सत्कार केला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- सुखदेव रामभगत गर्जे, विजय गहिनीनाथ पालवे,श्रीमती अनिता एकनाथ गर्जे,श्रीमती कुसुम तुकाराम धायतडक, सुनील जगन्नाथ ढाकणे, नारायण शंकर गर्जे, विठ्ठल राजाराम डुकरे, बाबासाहेब बाळासाहेब गर्जे, सुभाष विक्रम घुगे
मारुती रुस्तुम पालवे, शिवाजी रामकीसन गर्जे, संजय शंकर पंडित, प्रकाश जगन्नाथ थोरात विजयी झाले आहेत.
संस्थेचे 925 सभासद असून 805 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.चालू वित्तीय वर्षात एकूण पावणे चार कोटी कर्जवाटप झाले आहे.अशी माहीती चेअरमन सुखदेव गर्जै यांनी दिली आहे.