मराठा समाजातील तरूणांनी स्वत: चे कौशल्य जगासमोर आणावे-खा.सुजय विखे
स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने नोकरी मेळावा उत्साहात संपन्न
श्रीगोंदा- प्रतिनिधी
मराठा समाजातील तरूणांनी परिस्थितीने खचून न जाता व्यवसाय करुन आर्थिक सक्षम व्हावे हाच एकमेव बेरोजगारीवर पर्याय आहे. आपल्यातले कलाकौशल्य ओळखून फक्त नोकरी मागे न पळता स्वत:चे गुण पुढे आणावे असे उदगार अहमदनगर दक्षिण लोकसभा विधान सभा मतदार संघाचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी काढले.
श्रीगोंदा येथे प्रगती मंगल कार्यालय या ठिकाणी स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी खा.सुजय विखे बोलत होते
याप्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे डॉ.कृषिराज टकले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण दिल्यास समाज आर्थिक सधन होईल शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची गरज आहे समाजाचे संगठन होणे आवश्यक आहे. यासाठी मराठा नेत्यांनी एकत्र यावे मराठा तरूणांना रोजगार देणे हा संघटनेचा मूळ हेतू आहे
या कार्यक्रम प्रसंगी मा. आ.बबनदादा पाचपुते, स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ.कृषिराज टकले ,जेष्ठ नेते घनश्याम शेलार,काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे,राजेंद्र म्हस्के,राकेश पाचपुते,सुवर्णा पाचपुते,स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुभाष गागरे,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंकुशराव डांभे, प्रसिध्दीप्रमुख अमोलराजे म्हस्के ,जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांतदादा कराळे, युवक जिल्हा अध्यक्ष योगेश गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष कचरु चौधरी, शेवगाव तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर ,राहुरी तालुका अध्यक्ष शरद खांदे,पारनेर तालुका अध्यक्ष निलेश दरेकर,लौकेश डौले,आदि उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुधीर नागवडे यांनी केले सुत्रसंचालन राजेंद्र नागवडे यांनी केले.