अहमदनगर जिल्ह्यातील सुंदर गावे जाहीर; खाडांबे, वाळवणे, गणोरे, आव्हाने, निमगाव व खडकेवाकेसह 'त्यां'चाही समावेश
By Admin
अहमदनगर जिल्ह्यातील सुंदर गावे जाहीर; खाडांबे, वाळवणे, गणोरे, आव्हाने, निमगाव व खडकेवाकेसह 'त्यां'चाही समावेश
अहमदनगर- प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या वतीने आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार वितरण मंगळवारी (१६ फेब्रुवारी) शहरातील माऊली संकुल सभागृहात सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. त्यासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झालेली गावे अशी :
प्रथम पुरस्कार
वर्ष २०१८-१९) : खाडांबे खुर्द (राहुरी) व वाळवणे (पारनेर) यांना विभागून
वर्ष २०१९-२०) : गणोरे (अकोले) व आव्हाने बुद्रुक (शेवगाव) यांना विभागून
वर्ष २०२०-२१) : निमगाव बुद्रुक (संगमनेर) व खडकेवाके (राहता) यांना विभागून
तालुकास्तरीय पुरस्कार (वर्ष २०२०-२१)
तालुका | ग्रामपंचायत |
अकोले | डोंगरगाव |
संगमनेर | निमगाव बुद्रुक |
कोपरगाव | करंजी |
श्रीरामपूर | जाफराबाद व मुठे वडगाव (विभागून) |
राहता | खडकेवाके |
राहुरी | सडे |
नेवासा | वडाळा बहिरोबा |
शेवगाव | राक्षी |
पाथर्डी | चिचोंडी |
जामखेड | खर्डा |
कर्जत | कोपर्डी व कानगुडवाडी (विभागून) |
श्रीगोंदा | मढेवडगाव |
पारनेर | जामगाव |
नगर | टाकळी खातगाव |
कार्यक्रमासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी दिली आहे.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार अरुण जगताप, आमदार किशोर दराडे, आमदार राधाकृष्ण विखे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार डॉ. किरण लहामटे व आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर उपस्थित राहणार आहेत.