पाथर्डी नगरपालिकेचे नागरीकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष ; पदाधिकारी प्रशासनावर नागरीकांचा तीव्र संताप- सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जै यांचे लाक्षणिक उपोषण
By Admin
पाथर्डी नगरपालिकेचे नागरीकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष ; पदाधिकारी, प्रशासनावर नागरिकांचा तीव्र संतप्त,
- सामाजिक कार्येकर्तै नागनाथ गर्जै यांचे लाक्षणिक उपोषण
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील नागरी समस्या सोडविण्याकडे पालिका पदाधिकारी, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जे यांनी पाथर्डी नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाविरोधात लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला शहरातील नागरिकांसह कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.
पाथर्डी शहरामध्ये नळाला येणारे मैल मिश्रीत पाणी त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. लोकनेते गोपीनाथजी मुंढे जॉगिंग पार्कचे साडेचार कोटीचे काम चार वर्षा पासून खितपत पडले आहे व
त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे संशयास्पद आहे. मागील वर्षी पाथर्डी शहर स्वच्छतेचे टेंडर ९६लाखाचे होते,ते या वर्षी एक कोटी ऐशी लाखापर्यंत मंजूर
केले.पस्तीस हजार लोकसंखेच्या पाथर्डी शहरात एकच मुतारी आहे,यावरुन पालिकेचा कमालीचा निष्काळजी पणा निदर्शनास येतो.नाईक चौक ते चिंचपूर रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे. राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ चे काम त्वरित व वेगाने चालू करावे. पाथर्डी शहराच्या अनेक भागात रस्ते,पाणी,व वीज या नागरी समस्यांचा मोठा प्रश्न आहे.
याबाबत नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार (दि.१२) अजंठा चौक पाथर्डी येथे श्री गर्जे यांनी केलेल्या उपोषणात माजी नगराध्यक्ष अँड दिनकर पालवे, बाळासाहेब सुद्रूक,आपचे किसन आव्हाड, भाजपचे प्रा.सुनीलराव पाखरे, डॉ.सुरेश पाटील टकले, संजय बांगर, विनायक बडे, रफिक शेख, सोनू सारूक, मुकुंद गर्जे, सुनील बेळगे, वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सोनटक्के, भोरूशेठ म्हस्के, पै.सुभाष पवार, पै महेश पवार, पै पांडुरंग माने, शिवसेनेचे सुरेश हुलजुते, व्यापारी असो.चे मनोज गांधी, अभय गांधी, घेवरचंद भंडारी, सुभास भंडारी, सोमनाथ फासे, भास्कर लाड, कॉंग्रेसचे मिठ्ठूभाई शेख, जुनेद पठाण, सूर्यभान गर्जे, नबाबभाई शेख, रवींद्र पालवे, विवेक देशमुख, सुखदेव मर्दाने, आरपीआयचे महेश अंगारखे, राष्ट्रवादीचे योगेश रासने, देवा पवार, लक्ष्मण बोरुडे, पप्पूशेठ बनसोड, भगवान महासंघाचे महेश दौंड, बाबुराव बोरुडे पाटील, भास्कर लाड, उद्धव दराडे, घनश्याम गर्जे, आनंतराजे कराड, अविनास बनसोड, भानुदास गोरे, वजीर शेख, शुभम सुपेकर, अनंत बनसोड, संदीप बनसोड आदिंसह नागरिकांनी उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी होऊन समर्थन दर्शवले.
उशिरापर्यंत चाललेल्या उपोषणास नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी उपोषणकर्ते व पालिका कार्यालयीन अधीक्षक आयुब शेख, सोमनाथ गर्जे, अशोक डोमकावळे यांच्यात चर्चा घडवून आणली. पालिकेच्या वतीने लेखीपत्र देण्यात आले. यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक डेरे ,सहायक पो.निरीक्षक जावळे, सहायक पो.निरीक्षक राठोड व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.
नागरी सुविधा देण्यास नगरपालिका असमर्थ ठरल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल तसेच ठेकेदारी व स्वार्थासाठी केलेला पदाचा वापर यामुळे नागरिकांना व उपोषण करत्यास तोंड दाखविल्यास त्यांच्या रोषाला व सत्याला सामोरे जावे लागेल त्यामुळे नगराध्यक्षा सह सर्व नगरसेवकांनी उपोषणाकडे पाठ फिरवली. परंतु यापुढील कालखंडात पालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात तीव्र स्वरूपाचा लढा व संघर्ष चालूच राहील.
- प्रा.सुनील पाखरे