आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली कळसपिंपरी वि. का. सोसायटी निवडणूक 12/01 बिनविरोध
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी-शेवगाव विधानसभेच्या लोकप्रिय आणि कार्यसम्राट मा.आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली कळसपिंपरी गावात वि. का. सोसायटीची निवडणूक पार पडली.
यामध्ये आमदार ताईसाहेब यांच्या पँनलचे सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी म्हणून नवनाथ सुधाकर भवार, चव्हाण यमाजी शिवराम, हरिचंद्र मारुती भाकरे, गणगे राजेंद्र विठ्ठल, बुळे रावसाहेब चंद्रभान, शेख अमीन चांदभाई, मिसाळ सोन्याबापू मुरलीधर,येढे विकास सखाहारी तर अनु, जाती, जमाती मध्ये गाडे भानुदास नाथ, इतर मागास प्रतिनिधी वर्ग मध्ये सरपंच दिगू शेठ भवार, विभक्त जाती जमाती प्रतिनिधी मध्ये चव्हाण गोवर्धन कोंडीराम तर महिला राखीव प्रतिनिधी मध्ये किलबिले मुक्ताबाई बाबासाहेब इत्यादी 12 जागा बिनविरोध निवड करण्यात आली. तर विरोधी पॅनलचे महिला राखीव प्रतिनिधी जागे मध्ये शेळके शोभा राजेंद्र जागा बिनविरोध करण्यात आली.आणि कळसपिंपरी गावची वि.का.सोसायटी तब्बल 12/01 अश्या फरकाने निवडणूक बिनविरोध करण्यात आली.आणि लवकरच आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वखाली व हरीहरेश्वर पँनलचे अध्यक्ष भाऊसाहेब तात्या भवार,सरपंच दिगू शेठ भवार, चेअरमन नवनाथ शेठ भवार, रामकिसन शेळके, राजेंद्र मिसाळ, संतोष मिसाळ, सोमनाथ बुळे, त्रंबक गणगे, रहीम शेख, बाबभाई शेख, अनिल पवार, शिवाजी बुळे, गोविंद गणगे, सोपान काकडे, रामकिसन बुळे, बाबासाहेब भवार, अंकुश मिसाळ, यांच्या साथीने लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.