विहीर खोदकाम करताना जिलेटीन काड्यांचा स्फोट; दोघांचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लोणी सय्यदमीर ता. आष्टी, जि. बीड) अशी मृत कामगारांची नावे आहेत.
विहीर खोदकाम करणार्या दोन कामगारांचा अंगावर खडक, मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाला. प्रल्हाद रोहिदास रक्ताटे (वय 28) व विलास शिवाजी वाळके (वय 40 दोघे रा.
नगर तालुक्यातील सारोळाबध्दी शिवारात ही घटना घडली आहे. सरोळाबध्दी शिवारात बोरूडे यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते.
यासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार होते. ब्लास्टिंगचे स्फोटके ठेवण्यासाठी खडकाला ड्रिल मशीनच्या सहाय्याने छिद्र पाडण्याचे काम सुरू होते.
त्यावेळी अचानक खडक व मातीचा ढिगारा कोसळला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान दोन्ही कामगारांचा मृत्यू ढिगारा कोसळून नव्हे, तर जिलेटीन काड्यांच्या स्फोटात झाला असून, त्याला ठेकेदाराचा निष्काळीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
यासंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,'घडलेल्या घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अद्याप नातेवाईक फिर्याद देण्यासाठी आले नसून नातेवाईकांनी फिर्याद दिलीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल'.