महाराष्ट्र
60
10
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने श्री आनंद महाविद्यालयात व्याख्यान
By Admin
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने श्री आनंद महाविद्यालयात व्याख्यान
पाथर्डी प्रतिनिधी
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे पाथर्डी येथील श्री आनंद महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लब व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक विषयावरती रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेकरीता लोकशाहीत असलेले मताधिकार, याचे महत्त्व व मतदान :राष्ट्रीय कर्तव्य आणि महत्व हे विषय देण्यात आले होते . २५ जाने २०२२ रोजी गुगल मिट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त "लोकशाहीत असलेले मताधिकाराचे महत्त्व" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
प्रा. एकनाथ बोरुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व सांगितले. मतदारावर ह्या लोकशाहीची मोठी भिस्त आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. शेषराव पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला असून, जगातील सर्वात मोठे लोकतंत्र असलेले राष्ट्र म्हणून आपल्याकडे पाहिले जात आहे. मतदार आणि मतदान या दोन्ही घटकाकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गुगल मिट च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक शेटे मनीषा, द्वितीय क्रमांक जायभाये सचिन ,तृतीय क्रमांक बेळगे कोमल व उदारे पूनम यांना विभागून देण्यात आला .तर रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बुरकुले साक्षी ,द्वितीय क्रमांक दाते प्रतिक्षा ,तृतीय क्रमांक हंडाळ जयश्री व शिरसाट पूजा यांना विभागून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी केले तर प्रा. संतराम साबळे यांनी निबंध व रांगोळी स्पर्धेचे परिक्षण केले. प्रा. इस्माईल शेख यांनी आभार मानले.
Tags :

