वामनभाऊ व भगवान बाबांची पुण्यतिथी साजरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात वामनभाऊ व भगवान बाबांचे भक्त शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे व सुभाष भागवत सर यांच्या संकल्पनेतुन वामनभाऊ महाराज व भगवानबाबांची पुण्यतिथी शंकर महाराज मठाचे मठाधीपती माधव बाबा यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. सर्वप्रथम माधव बाबांनी वामनभाऊ व भगवान बाबांच्या प्रतिमेचे पुजन केले व पुष्पहार घातले. यावेळी माधव बाबा म्हणाले की वामनभाऊ महाराज व भगवान बाबा हे अवतारी महात्मे होते. त्यांनी समाजाला भक्ती मार्गात आणले.वामनभाऊ महाराज व भगवान बाबांचा जन्म भरकटलेल्या समाजाला भक्ती मार्गात आणण्यासाठी झाला. तसेच या दोन्ही महात्म्याने अंधश्रद्धा व जुन्या चालीरितीवर प्रहार करुन सत्याचा मार्ग स्वीकारल्यामुळे या दोन्ही माहात्म्याचे कार्य आलौकीक आहे तसेच हे महात्मे अजरामर आसुन चंद्र सुर्य असेल तो प्रयन्त त्यांचे नाव निघेल कारण भक्ती मार्गातील त्यांचे स्थान सर्वोच्छ असे आहे. या माहात्म्याची पुजा करण्याचा योग आमचे भक्त बाळासाहेब ढाकणे यांच्यामुळे मला आल्यामुळे मी धन्य झालो आहे. बाळासाहेब ढाकणे यांची भक्ती मार्गात खुप मोठी श्रद्धा आहे व समाजकारण देखील चांगले आहे.त्यांच्या कार्यास वामनभाऊ व भगवानबाबांचा आशिर्वाद मिळो तसेच त्यांचे चिरंजीव अभिषेकला उत्तम यश व उंदड आयुष्य लाभो अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भगवंत भक्त भागवतराव पालवे व युवा सेना शहराध्यक्ष सचीन नागापुरे उपस्थित होते.