Breaking-दुसराही खून करुन भाऊ झालता पसार
अनैतिक संबंधातून आणखी एका महिलेची हत्या- खुन्याला पकडण्यात यश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आपल्या पत्नीची हत्या करून शिक्षा भोगून बाहेर आलेल्या इसमाने अनैतिक संबंधातून आणखी एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा आळेफाटा पोलिसांना अवघ्या एका तासात केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक देखिल केली आहे. अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसे पोलीस तपासातुन देखिल समोर आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, संतोष बबन मधे (वय ३८) हा आरोपी आणि मृत महिला हे दोघेही अनैतिक संबंधातून जुन्नर तालुक्यातील रानमळा येथे राहत होते. संतोष हा वारंवार दारू पिऊन सबंधित महिलेला शिवीगाळ व मारहाण करून तिचा छळ करत होता. यानंतर ती महिला रानमळा परिसरातील एका शेताच्या कडेला वेगळी राहायला लागली. संतोषने याच गोष्टीचा राग मनात धरला आणि बुधवारी पहाटेच्या दरम्यान त्याने सदर प्रियशीला डोक्यात तसेच तोंडावर धारदार शस्त्राने वार करुन तिची हत्या केली. अशी फिर्याद मयत महिलेच्या वडीलांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली आहे.
आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवून दिला. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा तपास सुरू केला. यानंतर संतोषला बेल्हे परीसरातुन अटक करण्यात आली आहे. चौकशी केली असता खून केल्याची कबुली पोलिसांना त्याने दिली आहे.