महाराष्ट्र
186
10
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा
By Admin
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा
देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
पाथर्डी प्रतिनिधी
महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शूरवीर टिपू सुलतान बद्दल केलेल्या वक्तव्यावरून पाथर्डी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ने केली. या संदर्भातील निवेदन तहसीलदार शाम वाडकर तसेच पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्याकडे देण्यात आले.
या आंदोलनामध्ये बहुजन वंचित आघाडीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. "विरोधी पक्षनेत्यांची वैचारिक वाढ, व वैचारिक जडण-घडण रेशीम बागेत झालेले, आरएसएस मध्ये वाढलेले देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक, महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिमांत अतिशय शांततेचे वातावरण असतांना या दोन्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणून अशी वक्तव्य करत आहेत. काही कारण नसतानाही शूरवीर योद्धे असणाऱ्या टिपू सुलतान यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केलं," असा आरोप चव्हाण यांनी केला.
मोर्चा मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा निषेध असो.. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद.. अशा वंचितच्या मोर्चात घोषणा देण्यात आल्या. किसन चव्हाण तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है चा नारा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला. घोषणांमुळे तहसील कार्यालय दुमदुमून गेले होते.
मोर्चात पाथर्डी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हस्के, जिल्हाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, महेश पवार, बाळासाहेब तुजारे, सनी दिनकर, आकाश धनवडे, दीपक धनवडे, दिलावर बागवान, अमोल मासाळकर, अफरोज बागवान, शाहरुख पिंजारी, अयाज बागवान, इलियास बागवान, अक्षय फतपुरे, अश्पाक बागवान, लालू बागवान, अजीम पठाण, सलमान बागवान, शाहरुख बागवान, सुनील जाधव, एकनाथ दराडे, अंबादास डोंगरे, विनायक देशमुख, कालूभाई शेख, आशिर्वाद कचरे, अशपाक शेख, युसुफ शेख, सुनिता जाधव, रोहिणी ठोंबरे, शैलाताई चव्हाण, सुभद्रा भोसले, सीमा चव्हाण, योगिता भोसले, सुनिता भोसले, मनिषा आराख, जनता चव्हाण आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Tags :

