श्री आनंद महाविद्यालय व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी येथील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे श्री आनंद महाविद्यालय आणि जिल्हा उपरुग्णालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळ विभागाच्या वतीने मिशन युवा स्वास्थ मोहिमे अंतर्गत महाविद्यालयात २५ ऑक्टोबर रोजी कोवीड - १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. जगन्नाथ बरशिले यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण मोहिम मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, लसीकरण झाले तरच आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर पडू व महाविद्यालय पुर्वी प्रमाणे पूर्ण क्षमतेने सुरू होतील. त्यामुळे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
लसीकरण मोहिमेत बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, पाथर्डी तालुका विभागीय नोडल अधिकारी प्रा. डॉ. बबन चौरे, आनंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. पवार , लसीकरण प्रभारी सारिका विधाते, आरती डोंगरे, छाया खेडकर, मीना जगदाळे, सुपर्भा शिंदे, कलिंदा पवार, गोरे सर, वारडे सर, शिवाजी पवार जिल्हा उपरुग्णालय पाथर्डी, उमेश कुलकर्णी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. जगन्नाथ बर्शिले, प्रा. डॉ. इस्माईल शेख व प्रा . डॉ. धीरज भावसार यानी परिश्रम घेतले.
शिबिर यशस्वीतेसाठी श्री तिलोक ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे व खजिनदार सुरेश कुचेरिया यांचे मार्गदर्शन लाभले.