महाराष्ट्र
ढाकणे पॉलिटेक्निकमध्ये कॅम्पस मुलाखतींद्वारे ४७६ विद्यार्थ्यांची निवड
By Admin
ढाकणे पॉलिटेक्निकमध्ये कॅम्पस मुलाखतींद्वारे ४७६ विद्यार्थ्यांची निवड
पाथर्डी - प्रतिनिधी
आजादीका अमृतमहोत्सव अंतर्गत शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील कै. सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्नीक कॉलेज या तंत्रनिकेतन आणि समर्थ प्रायव्हेट आय. टी. आय यांच्या संयुक्त विद्यमाने ढाकणे शैक्षणिक संकुलामध्ये दि. ०६ जुलै २०२२ रोजी कॅम्पस मुलाखतींद्वारे ४७६ विद्याथ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांनी दिली.
या कॅम्पसमध्ये पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, बारामती, वाळूंज, शेंद्रा, चाकण, रांजणगाव इत्यादी औद्योगिक परिसरांमधील ३८ अग्रमानांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. यामध्ये ढाकणे पॉलिटेक्निकचे १६८ विद्यार्थी, समर्थ आयटीआयचे ५३ विद्यार्थी आणि इतर संस्थांचे १५५ अशा ४७६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
गुणवत्तापूर्वक आणि विद्यार्थीभिमुख शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहे. विद्याथ्यांना कोर्स पूर्ण होण्यापूर्वीच नेमणूक पत्र मिळाले असून, ग्रामीण भागातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी ढाकणे पॉलिटेक्नीक रोजगार निर्मिती केंद्र म्हणून निर्माण झाले आहे.
विद्यार्थीभिमुख विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांना वाव मिळून त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून बदलत्या कालानुरूप स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आली आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना मिळालेली नोकरीची संधी हे त्याचेच परीपाक असल्याचे प्राचार्य डॉ. आर.एच अत्तार म्हणाले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे, सचिव श्रीमती जया राहणे, समन्वयक ऋषिकेश ढाकणे, प्राचार्य डॉ. आर. एच अत्तार, आयटीआयचे प्राचार्य संतोष आंधळे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड, अकॅडेमिक कॉर्डीनेटर प्रा. सुनिल औताडे, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. सचिन म्हस्के, सिव्हील विभागप्रमुख प्रा. इर्शाद पठाण व ईअॅण्डटीसी विभागप्रमुख प्रा. अश्विनी गोरे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Tags :
39
10