आव्हाड महाविद्यालयात वस्तू व सेवाकर वक्तृत्व स्पर्धा
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी कला व वाणिज्य या वर्गामध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी) या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची ओळख व्हावी, म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले होते.स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक महेश सातपुते तर द्वितीय क्रमांक आयर्न गर्जे आणि तृतीय क्रमांक संस्कृती ससाणे व अश्विनी गायकवाड या विद्यार्थ्यांनी मिळविला.
सहभागी विद्यार्थ्यांचे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.शेखर ससाणे यांनी अभिनंदन केले.सदर स्पर्धेचे आयोजन प्रा.माया पवार यांनी केले तसेच स्पर्धेचे परीक्षण प्रा.अनिल नारखेडे यांनी केले.
सदर स्पर्धेमध्ये प्रा.जया पालवे इतर प्राध्यापक उपस्थित होते.