पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अहमदनगरचे जिल्हाधिकारी डाॕ. राजेंद्र भोसले यांच्याशी उद्या संवाद साधणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 19 मे 2021,बुधवार
पंतप्रधान नरेंद्र मोदीचा उद्या अहमदनगरच्या जिल्हाधिकारी डाॕ. राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधणार असून जिल्ह्यातील कोरोना संबंधी परीस्थीतीचा आढावा घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरूवारी (२० मे) कोरोनाचा आढावा घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यासाठी निवडण्यात आलेल्या देशातील ५६ जिल्ह्यांमध्ये राज्यातील १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे.
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त हे सहभागी होणार आहेत. कोरोनासंबंधी गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, सातारा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी व बीड या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांचा संवाद होणार आहे.
देशातील केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड, झारखंड व ओडिसा या राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पंतप्रधानांकडून काही सूचनाही केल्या जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत संबंधित मुख्यमंत्र्यांनाही सहभागी होण्यास सांगण्यात आलेले आहे.