पाथर्डीत खासदार सजंय राऊत यांचा निवेदन देऊन निषेध
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 19 मे 2021, बुधवार
पाथर्डी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी यांच्याशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने या घटनेचा नवभारत प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर निषेध करून नायब तहसिलदार पंकज नेवसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रितम मेहेर, ताराप्रसाद जोशी, सोमनाथ घोरतळे, ज्ञानेश्वर खाटीक आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
'शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'सामना' या मुखपत्राच्या लेखामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बनर्जी यांच्याशी केली. अखंड हिंदुस्तानामध्ये ज्या कर्तबगार स्त्रियांनी आपले आयुष्य हिंदूंच्या रक्षणासाठी व्यथित केले, त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. ज्यांनी अनेक हिंदूच्या मंदिरांचा जिर्णोद्धार केला. अशा या महान विभूतींची तुलना ममता बनर्जी यांच्याशी करून चुकीचे लिखाण करणाऱ्या संजय राऊत यांचा हिंदुत्ववादी व राष्ट्रप्रेमी विचारांचे कार्यकर्ते जाहीर निषेध करत आहे,' असे या निवेदनात म्हंटले आहे.