नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे ? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून काेरोना वाढत नाहीये का ? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत, अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतापले. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाहीये. १० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर जेल भोरो आंदोलन करा मी तुमच्या बरोबर राहील, असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला.नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेवून राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरे उघडण्या साठी सरकारकडे पाठपुरावा करावा, असे साकडे घातले. मंदिर बचाव कृती समितीचे प्रमुख वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, श्री शिव प्रतिष्ठानचे बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे आदी उपस्थित होते.