महाराष्ट्र
1360
10
अज्ञाताकडुन सिताफळाच्या शंभर झाडांची कत्तल
By Admin
अज्ञाताकडुन सिताफळाच्या शंभर झाडांची कत्तल
बालमटाकळी येथील अशोक रमेश म्हस्के यांच्या शेतात घडली घटना.
शेवगाव पोलीसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल तर अधिकाऱ्यांनीही केली प्रत्यक्ष पाहणी.
दोषींवर कडक कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांने केली मागणी.
..................................................................
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील अशोक रमेश म्हस्के वय वर्ष २६ या तरुण शेतकऱ्याच्या फळबागेच्या शेतामधील शुक्रवार दि. २७ रोजी रात्रीच्या वेळेस बालमटाकळी शिवारातील गट नंबर ४१/५ या क्षेत्रामधील सुमारे दोन वर्षाच्या दीड एकर फळबागेमधील ६५० सीताफळाच्या झाडापैकी १०० च्या आसपास सीताफळाचे झाडे अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने खोडापासून तोडून टाकले असून सदरील घटनेविषयी शेवगाव पोलीसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील रहिवासी असलेले तरुण शेतकरी अशोक रमेश म्हस्के वय वर्षे २६ यांनी दोन वर्षांपूर्वी उसनवार करून तसेच बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपल्या दीड एकर क्षेत्रात ६५० सीताफळाच्या झाडाची लागवड केली होती, त्याला दोन वर्षांपासून जीवापाड जपले होते आणि येन फळ लागायच्या कालावधीतच शुक्रवारी दि. २७ रोजीच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी ६५० पैकी १०० च्या आसपास झाडे धारदार हत्याराच्या सहाय्याने खोडापासून तोडून टाकली आहेत. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार लक्षात आल्याने संबंधित शेतकऱ्याने सदरील घटनेविषयी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनाचे बोधेगाव दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भागवान बडधे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव पवार, महसूल विभागाचे तलाठी बाबासाहेब अंधारे, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक गणेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली असून पुढील तपास बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान बडधे हे करीत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशा प्रकारची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. तसेच दोषी व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी देखील गावकऱ्यांनी केली आहे.
Tags :

