पाथर्डी तालुक्यात जिल्हा परीषद शाळेत चोरी ; गुन्हा दाखल
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दरवाजाचे कुलूप तोडून शाळेतील एल.इ.डी टिव्ही व संगणक असा वीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा रेपाळ यांनी पाथर्डी पोलिसात दिली आहे.
मुख्याध्यापक कृष्णा रेपाळ व सहकारी शिक्षिका मालन बळीराम करे या मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शाळेवर गेल्या होत्या. यावेळी शाळेच्या दरवाज्याचा कडी कोंडा व कुलूप तुटलेले दिसले. आत मध्ये जाऊन त्यांनी पाहिले असता मुलांना शिकण्यासाठी ग्रामपंचायतीने दिलेला एल.इ.डी टिव्ही व संगणक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा रेपाळ यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.