पाथर्डी : दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन अत्याचार ; पाथर्डी पोलिसांकडून तिघांना अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करणारा एक जण आणि या आरोपींना मदत करणारे दोघे, अशा तीन जणांना पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्हा न्यायालयाने या तिघांना 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सागर मोहन उदार (वय 26, रा. निवडुंगे, ता.पाथर्डी), महादेव बबन चव्हाण (वय 21, रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) व महेश आश्रुबा खेडकर (वय 24, रा. धान्य गोडाऊन शेजारी, भगवाननगर, ता पाथर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.
मुख्य आरोपी पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. तालुक्यातील दोन अल्पवयीन मुली शनिवारी शाळेत गेल्या होत्या. संध्याकाळी त्या परत घरी आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चक्रे फिरवित या तीन आरोपींना अटक केली. यातील मुख्य फरार आरोपी व सागर मोहन उदार यांनी पीडित दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. त्यांना या आरोपींनी मदत केली.
आरोपींनी चकवा दिल्यानंतरही पोलिसांनीही चतुराईने तपास करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन लिमकर, श्रीकांत डांगे, कर्मचारी कृष्णा बडे, अक्षय लबडे, संदीप बडे, भगवान गरगडे, सागर मोहिते, ईश्वर बेरड, पोपट आव्हाड, विकी पाथरे, राजेंद्र सुद्रुक,संजय बडे यांनी दोन दिवस तपास करीत आरोपींना जेरबंद केले. पोलिस फरार असलेल्या मुख्य आरोपीच्या मागावर आहे.