महाराष्ट्र
1156
10
ऊसतोडणी मजूर हत्या प्रकरणी 'या' व्यक्तीस पोलिसांनी केली अटक
By Admin
ऊसतोडणी मजूर हत्या प्रकरणी 'या' व्यक्तीस पोलिसांनी केली अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
करंजी - मुकादमाने केलेल्या मारहाणीत काल मरण पावलेल्या खंडांबे येथील संजय माळी याच्या खुनाचा गुन्हा शेवटी पाथर्डी पोलिसांनी दाखल करुन आरोपी मुकादम अशोक जाधव याला एका दिवसात अटक केली तर गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत .
खडांबे ता. राहुरी येथील संजय काशिनाथ माळी व सोमनाथ पांडुरंग दळवी (वय ३९) या ऊसतोडणी कामगारास मुकादम अशोक जाधव (रा. हारेवाडी ता. आष्टी,जि. बिड) व भागिनाथ धोंडीबा पांढरपिसे (रा. मोहोजदेवढे,ता. पाथर्डी) यांनी उचल दिली होती. परंतु यांना काही कारणामुळे ऊस तोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यास उशिर झाला याचा राग मनात ठेवुन मुकादम अशोक जाधव व भागिनाथ पांढरपिसे यांनी त्यांना त्यांच्या खडांबे गावी जावुन आणुन अशोक जाधव यांच्या हारेवाडी गावातील खोलीत ठेवुन त्यांना काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यातच संजय काशिनाथ माळी याचा मृत्यु झाला. मयत संजय माळी याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी संजय माळीचा साथीदार सोमनाथ पांडुरंग दळवी यास आपण यास दवाखान्यात घेवुन जावु असे खोटे सांगुन मोटारसायकलवर दोघांच्या मध्ये बसवुन करंजी घाटात आणुन कठड्यावरुन खाली ढकलून दिले. सोमनाथ दळवी यास हे कोणाला सांगायचे नाही असा दम देवुन तुला ५०० रु. देतो तु घरी जा असे सांगितले. सोमनाथ दळवी घरी न जाता ही हकिगत पाथर्डी पोलिसांना जावुन सांगितली. परंतु खुनाचा गुन्हा
अंभोरा, ता. आष्टी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडूनही त्यांनी गुन्हा दाखल करुन न घेतल्याने पाथर्डी पोलिसांनी सोमनाथ दळवी याच्या दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३०२,२०१,३४२,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी अशोक जाधव यास चोवीस तासात अटक केली मात्र त्याचा दुसरा मुकादम साथीदार भागिनाथ पांढरपिसे फरार झाला.
करंजी घाटाच्यावर अंभोरा (ता.आष्टी) पोलिस स्टेशनची हद्द सुरु होते खुनाचा गुन्हा अंभोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडुनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्या अंभोरा पोलिस स्टेशनच्या कारभाराविषयी नागरिकांनी नाराजी व संताप व्यक्त केला आहे. त्याउलट पाथर्डी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल करुन आरोपी चोवीस तासात गजाआड केल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. याकामी पाथर्डी पोलिस स्टेशनचे पीआय सुहास चव्हाण, प्रविण पाटील, कायदे, पो.काॅ. अरविंद चव्हाण, सतिष खोमणे, किशोर पालवे, अमोल आंधाळे यांनी विशेष कामगिरी बजावली.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)