मुळा नदीपात्रात विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अक्षदा वाघ असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव असून रात्रीच्यावेळी ती कोणालाही न सांगता घरातून बाहेर गेली.
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मुळा नदी पात्रात नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अक्षदाच्या कुटुंबियांनी रात्रभर तिचा शोध घेतला. परंतु, रात्र उलटूनही तिचा तपास लागला नाही. काही नागरिकांना आज सकाळी मुळानदी (Mula River) पात्रामध्ये अक्षदाचा मृतदेह (Dead Body) पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी संगमनेर पोलीस दाखल होत अक्षदाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. अक्षदाने आत्महत्या केली कि तिची हत्या करण्यात आलीय याचा तपास संगमनेर पोलिस करत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.