निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वाहनाला अपघात,चालक जखमी; महाराज सुखरुप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
रस्ता ओलांडताना एका ट्रॅक्टरवर इंदुरीकरांची स्कॉर्पिओ आदळली. या अपघातात इंदुरीकर यांच्या गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे.
समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या वाहनाला जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी रात्री अपघात झाला.
सुदैवाने स्वत: इंदुरीकर महाराज मात्र सुखरुप आहेत. त्यांनी दुसऱ्या वाहनाने कार्यक्रमाचे ठिकाण गाठून तेथे नियोजित कीर्तनही केले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथे त्यांचे कीर्तन होते. त्यासाठी जाताना हा अपघात झाला.
इंदुरीकर त्यांच्या एमएच १२ टीवाय १७४४ या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून प्रवास करीत होते. जखमी चालकाला रुग्णालयात हलविण्यात आले.
तर इंदुरीकर महाराज दुसऱ्या वाहनाने पुढे रवाना झाले.अहमदनगर जिल्ह्यातील समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या वाहनाला जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी रात्री अपघात झाला.
सुदैवाने स्वत: इंदुरीकर महाराज मात्र सुखरुप आहेत. त्यांनी दुसऱ्या वाहनाने कार्यक्रमाचे ठिकाण गाठून तेथे नियोजित कीर्तनही केले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथे त्यांचे कीर्तन होते.
त्यासाठी जाताना हा अपघात झाला. इंदुरीकर त्यांच्या एमएच १२ टीवाय १७४४ या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून प्रवास करीत होते. जखमी चालकाला रुग्णालयात हलविण्यात आले. तर इंदुरीकर महाराज दुसऱ्या वाहनाने पुढे रवाना झाले.