महाराष्ट्र
181
10
विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्तीने यश अपयश पचवता आले पाहिजे- आ. मोनिका राजळे
By Admin
विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्तीने यश अपयश पचवता आले पाहिजे- आ. मोनिका राजळे
दादापाटील राजळे महाविद्यालयात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
पाथर्डी प्रतिनिधी
युगपुरुष राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्त व आमदार मोनिका राजीव राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त कासार पिंपळगाव येथील दादापाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन जि.प.सदस्य राहुल राजळे यांचे शुभहस्ते करण्यात आले.त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच आजच्या युवकांनी आधुनिक युगात बुद्धिमत्तेला महत्त्व दिले पाहिजे, मैदानी खेळांकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे, त्यामुळे बौध्दिक विकास होतो असे सांगितले.
श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ व व्हाईस चेअरमन रामकीसन पा. काकडे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा समारोप आमदार मोनिका राजीव राजळे यांच्या मनोगताने पार पडला. त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी यशाने हुरळुन जाऊ नये, तसेच अपयशाने खचून जाऊ नये, खिलाडूवृत्तीने यश- अपयश पचवता आले पाहिजे.आज आई-वडिलांच्या बरोबर देश सेवाही युवकांच्या मध्ये रूजवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पारंपरिक वेश परिधान करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविकात प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी महाविद्यालयातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी प्रा.डॉ. युवराज सूर्यवंशी, प्रा.डॉ. दादासाहेब मरकड, प्रा. बाळासाहेब ताठे, विक्रम राजळे, जे. आर. पवार,भास्करराव गोरे, डॉ. गवळी, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत बापट व त्यांचे सहकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.रोहित आदलिंग यांनी ही स्पर्धा आयोजन करण्यात विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह एकूण ६४ प्रतिस्पर्ध्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र इंगळे यांनी केले तर आभार प्रा.शामराव गरड यांनी मानले.
Tags :

