अध्ययना सोबत विचार क्षमता वृद्धिंगत करा – आय.पी.एस. महेश गीते
बालाजी अभ्यासिकेचे उद्घाटन समारंभ
पाथर्डी – प्रतिनिधी
कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना मोठे ध्येय ठेवून स्व अध्ययन करा, अध्ययना सोबत विचार क्षमता वृद्धिंगत करा याशिवाय पुस्तकी ज्ञाना सोबत प्रात्यक्षिक स्वरुपात अध्ययन आत्मसात केल्यास कोणत्याही परीक्षेत सहज यश संपादन करता येवू शकते असे प्रतिपादन तेलंगाना येथील आय.पी.एस.अधिकारी महेश गीते यांनी येथील बालाजी अभ्यासिकेचे उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते,औरंगाबाद येथील पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या सह मा. जिल्हापरिषद सदस्य प्रभावती ढाकणे,मा.पंचायत समिती सभापती सुनिता दौंड,मा.नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे,नंदकुमार शेळके,डॉ.संदीप पवार,अॅड.हरिहर गर्जे,अनुराधा फुंदे,मुकुंद गर्जे,डॉ.सुहास उरणकर,नितीन गर्जे,आशिष शर्मा,सचिन नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नाना गीते यांनी दिलखुलास उत्तरे दिले.कार्यक्रमांचे सुत्रसंचालन पोपट फुंदे यांनी तर आभार बालाजी अभ्यासिकेच्या संचालिका ज्योती शर्मा यांनी मानले.