वाहनांच्या बॅटरी चोरणार्या मास्टरमाईंडला गुन्हे शाखेकडून अटक, 12 गुन्हयांची उकल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शहरासह ग्रामीण भागातील वाहनांच्या बॅटरी चोरणार्या सराईताला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनीट सहाने अटक केली. त्याच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आणून ५ दुचाकी १४ बॅटर्या जप्त करण्यात आल्या आहेत.
शुभम जांभूळकर Shubham Jambhulkar (वय २४ रा. येरवडा - Yerwada) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. युनीट सहाचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सराईत वाहनचोर वाघोली परिसरात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शुभमला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चंदननगर हडपसर लोणवळा शिक्रापुर पाथर्डी नगर परिसरातून पाच वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. शुभमने वानवडी , हडपसर सिंहगड रोड , उत्तमनगर , निगडी परिसरात प्रत्येकी एक बॅटरी चोरी आणि चाकण हद्दीत दोन बॅटरी चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिली. (Pune Crime)
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगांवकर, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अशफाक मुलाणी सुहास तांबेकर यांनी केली.