महाराष्ट्र
276
10
शिर्डी- 'या' शहरातून आलेल्या अतिरेक्यांनी केली रेकी
By Admin
शिर्डी- 'या' शहरातून आलेल्या अतिरेक्यांनी केली रेकी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आता या देवस्थानाबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. पाकिस्तानी आतंकवादी संघटनेच्या माध्यमातून दुबईवरून आलेल्या आरोपींंनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली गुजरात एटीएसला दिली आहे.
शिर्डी हे देवस्थान जगप्रसिद्ध आहे. देशात आणि विदेशातही साईबाबांचे भक्त आहेत. भक्तांची भरपूर गर्दी साईनगरीत असते.
या वृत्तानंतर आता सुरक्षा यंत्रणापुढील आव्हान वाढले आहे. दरम्यान या आधी देखील अनेकदा साईमंदीराला धमकीचे निनावी पत्र तसेच मेल आलेले आहे.
गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही माहिती समोर आली आहे. शर्डी येथील मूळचे रहिवासी व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास असणारे हिंदी चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या दिल्ली येथील सुदर्शन कार्यालय व शिर्डी येथील त्यांच्या घरी रेकी केल्याची कबुली देखील दिली असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
दुबई येथील अटक केलेल्या आरोपी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी सुरेश चव्हाणके यांच्या मुळगाव शिर्डी येथील घराची रेकी केली आहे. या जिहादी आरोपींंकडे अनेक हत्यारे, दारुगोळा जप्त केला आहे.
गुजरात एटीएसच्या दाव्यानुसार या आरोपींचे पाकिस्तान आतंकवादी संघटनेशी संबध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत सहा मौलवीसह दोन असे आठ जणांना अटक करण्यात आली असून दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे शिर्डीसारख्या अती संवेदनशील ठिकाणी आतंकवादी संघटनेचे लोक येऊन रेकी करून जातात याबाबत पोलीस यंत्रणेला काही कळत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान आता सुरक्षायंत्रणाना जास्त सुरक्षा बाळगावी लागणार आहे. कारण हे आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे. या ठिकाणी भक्तांची नेहमीच वर्दळ असते.
भारतासह भारताच्या बाहेर देखील साई भक्तांची संख्या मोठी आहे.
Tags :

