शेवगाव- अर्बन बँक सोनेतारण घोटाळा 'या' व्यक्तीस 6 दिवसांची पोलीस कोठडी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दरम्यान या प्रकरणामध्ये १५९ कर्जदारांचा समावेश आहे . या प्रकरणात शेवगांव शाखेतील विशाल दहिवाळकर यास अटक करण्यात होती. पोलिसांनी शनिवारी दहिवाळकर यास न्यायालया समोर हजर केले असताना
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सन २०१७ ते २०२१ या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार यांनी संगनमत करून बनावट दागिने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
न्यायालयाने विशाल दहिवाळकर यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सोन्याच्या दागिन्याऐवजी खोटे दागिने असल्याचे उघड झाल्याने हा घोटाळा उघडकीस आला आहे.
यामुळे बँकेची मोठी प्रतिमा मलीन झाली होती. दरम्यान या प्रकरणात सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा घोटाळा घालण्यात आला आहे.
आता या प्रकरणी आरोपी दहिवाळकर यांच्याकडून पोलीस तपासात कोणाकोणाची नावे समोर येतील याकडेच अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे लक्ष लागून आहे.