पालक मंञी,जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय
अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचा विस्फोट झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याच माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर आठवडाभरात निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही प्रशासन कोरोना संसर्ग कमी होताच शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करेल, असे सांगितले.