पाथर्डी पंचायत समितीमध्ये 'या' कारणामुळे आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : जुन्या पंचायत समितीचे कार्यालय नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. मात्र जुन्या इमारतीत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही जुन्याच ठिकाणी असल्याने तो नवीन पंचायत समितीच्या आवारात बसविण्यात यावा, याप्रमुख मागणीसाठी बुधवारी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर बैठा सत्याग्रह करून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, शिवसेनेचे आसाराम ससे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे हुमायून आतार, दिगंबर गाडे, भाऊ तुपे आदीने हे आंदोलन केले.