बाबुजी आव्हाड महाविद्यालयात १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयाकडून १२ वी कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य विभागात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
याप्रसंगी भगवान ढाकणे व वनिता ढाकणे या विद्यार्थ्यांनी तसेच सौ. सुजाता वाघ व शिवनाथ ढाकणे या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व पालकांनी महाविद्यालय देत असलेल्या सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले.
गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे: कला विभाग, प्रथम क्रमांक – ढाकणे भगवान ८९.३३%, द्वितीय क्रमांक - चव्हाण श्रीकृष्ण ८४.८३%, तृतीय क्रमांक – कुसळकर निकिता ८४.०५%
वाणिज्य विभाग, प्रथम क्रमांक – भगत प्रसाद ९०%, द्वितीय क्रमांक - ढाकणे वनिता – ८९.३३%, तृतीय क्रमांक – बागवान सायमा – ८७%.
विज्ञान विभाग, प्रथम क्रमांक – चौरे अमित ९३.३३%, द्वितीय क्रमांक - पठाडे यश ९२.५०%, तृतीय क्रमांक – वाघ अनुराधा ९२.३३%
किमान कौशल्य विभाग, प्रथम क्रमांक – मापारी महेश ७१.८३%, द्वितीय क्रमांक – भोसले सोनाली ७१%, तृतीय क्रमांक - साळवे साक्षी ७०%.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. शेखर ससाणे, सुत्रसंचालन प्रा. सुरेखा चेमटे, तर आभार प्रा. मन्सूर शेख यांनी मानले.