महाराष्ट्र
1827
10
परिवर्तन प्रतिष्ठानच्या मोहोजदेवढे येथील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin
परिवर्तन प्रतिष्ठानच्या मोहोजदेवढे येथील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पाथर्डी प्रतिनिधी:
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
परिवर्तन प्रतिष्ठान भालगांवने या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी वृक्षलागवड करण्याचे काम सुरू केले आहे . परिवर्तन प्रतिष्ठान च्या अध्यक्षा तथा भालगाव सरपंच डाॅ.मनोरमाताई खेडकर आणि सचिव भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी या वर्षी जुन महिन्यापासून भालगाव ,मुंगुसवाडे, खरवंडी, तुळजवाडी , हनुमान गड या ठिकाणी शेकडो झाडे लावली आहेत . परिवर्तन प्रतिष्ठानच्या "झाडे लावा झाडे जगवा " या उपक्रमाला स्वतःच्या गावा शिवाय खरवंडी परिसरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असुन अनेक गावाकडुन त्यांच्या गावी येऊन वृक्षारोपण करावे, अशी मागणी वाढत आहे. नुकतेच मोहोज देवडे या गावी परिवर्तन प्रतिष्ठानकडुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात परिवर्तन प्रतिष्ठान चे सदस्य आणि मोहोज देवढे गावातील नागरिकांनी मोहोज देवढे गावातील चौकात तसेच गावात येणा-या रस्त्याच्या कडेला झाडे लावुन त्याला संरक्षण जाळया बसविल्या.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकात ह.भ.प. गहिनीनाथ गुरूजी यांनी परिवर्तन प्रतिष्ठान तसेच भालगावच्या सरपंच डाॅ.मनोरमाताई खेडकर यांच्याकडून केल्या जात आसलेल्या कामाची उपस्थितांना माहीती दिली . त्यानंतर भाजप वरीष्ठ नेते अशोक चोरमले यांनी त्यांच्या भाषणात परिवर्तन प्रतिष्ठान जागो जागी लावत असलेले झाडे आणि त्याचे करत आसलेले जतन या गोष्टीचे कौतुक करून सध्या भालगांव मध्ये झालेले विविध कामे आणि सध्या सुरू आसलेले उपक्रम याबद्दल भालगांव ग्रामस्थांचे अभिनंदन केले. या कामामुळे भालगांवचे नाव हे लवकरच हिवरे बाजार , पाटोदा या आदर्श गावासोबत घेतले जाईल, असा विश्वास व्यक्त केला . या प्रंसगी विभागीय प्रदुषण आयुक्त दिलीपराव खेडकर यांनी अध्यक्षीय भाषणात पर्यावरण चा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावुन ती जगवली पाहीजेत आणि हे काम दुसरा तिसरा येऊन करेल याची वाट न पाहता स्वतः केले पाहीजे. ज्याला जेथे जमेल तेथे झाडे लावुन वृक्षरोपनाची सुरवात करावी आणि "झाडे लावा झाडे जगवा" याची मोठ्या प्रमाणात चळवळ निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली . तसेच एस. एस. सी. परीक्षेत नाविन्यपूर्ण यश मिळवल्या बद्दल कु. पुजा गर्जे हीचा शाल श्रीफळ देऊन त्यांनी सत्कार केला . त्यानंतर मोहोज देवढे येथील शिक्षक श्री . खेडकर सर यांनी मान्य वर आणि उपस्थितांचे अभार मानले .
यावेळी दिलीपराव खेडकर, अशोक चोरमले, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, मा .जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल नाना खेडकर , ह.भ.प. गहिनीनाथ खेडकर गुरूजी , मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर, बंडू खेडकर, जलदुत तुकाराम खेडकर, मेजर सोमनाथ खेडकर, बाळासाहेब खेडकर, संजय बेंद्रे, तुकाराम केदार , राजु सानप बाळराजे खेडकर, किसन रोकडे, शिवाजी कराड, अजिनाथ केदार, बबलु खेडकर, अजिनाथ जायभाय ,गणेश कराड ,गोविंद रूपनर ,गणेश चितळकर, तुकाराम देवढे , प्रेमचंद खंडागळे, रामनाथ देवढे, अनिल गर्जे ,बाबुजी देवढे, रामकिसन चितळकर, भाऊराव रूपनार , तुकाराम हाके ,रामनाथ वाघमोडे, रामकिशन चितळकर, भाऊराव रूपनार , तुकाराम हाके , महादेव रूपनर, गोरख देवढे, महादेव नरोटे, कु. पुजा गर्जे तसेच पंचक्रोशीतील नागरिक आदी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Tags :

