महाराष्ट्र
1870
10
पाथर्डी- माणिकदौंडी रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन करू- प्रा. पाखरे यांचा इशारा
By Admin
पाथर्डी- माणिकदौंडी रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन करू- प्रा. पाखरे यांचा इशारा
पाथर्डी प्रतिनिधी:
राज्यमार्ग क्रमांक ५४ वरील पाथर्डी ते माणिकदौंडी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असून जाड आकाराची खडी उघडी पडली आहे. अनेक दुचाकीस्वार त्याठिकाणी पडून जखमी झाले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा सदर रस्त्याच्या हद्दीत लोटांगण आंदोलन करू, असा इशारा पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुनिल पाखरे व अंबादास शेकडे यांनी दिला आहे.
यासंदर्भात उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक ए.बी. दराडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
राज्य मार्ग क्र. ५४ वरील पाथर्डी ते माणिकदौंडी प्रवास करतांना शिरसाटवाडी हद्दीतील व रांजणी- केळवंडी हद्दीतील अंदाजे दोन्ही ठिकाणचे मिळून २५० ते ३०० मी. रस्त्याचे काम झालेले नाही. त्यातील शिरसाटवाडी हद्दीतील काही मीटर अंतर व रांजणी- केळवंडी हद्दीतील काही मीटर अंतर तेथील शेतकऱ्यांनी, जांच्या हद्दीतून रस्ता गेलेला आहे, त्यांनी हद्द निश्चिती व संपादित केलेल्या क्षेत्राच्या कारणास्तव सदर रस्त्याचे काम न्याय प्रविष्ट करून स्थगिती आणलेली आहे. ही सर्व गोष्ट आंम्हा आंदोलनकर्त्यांना माहित आहे.
सदर न्याय प्रविष्ट हद्द सोडून बाकी ठिकाणचे रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने व आपणासहित मागील उपअभियंत्याने प्रलंबित का ठेवले ? ठेकेदार कंपनीच्या बिलाला अडचण येईल, तुकडे बिले मंजूर होणार नाही, म्हणून अर्धवट व अपूर्ण ठेवले आहे का ? हा आम्हाला न समजणारा विषय झाला आहे.
सदर रोडवर प्रचंड खड्डे पडलेले असून जाड आकाराची खडी उघडी झाली आहे. येणारी वाहने दुचाकी सहित कासव गतीने चालावी लागतात. अनेक दुचाकी स्वार त्या ठिकाणी पडून जखमी झाले आहेत. आता तुम्ही व कंपनीवाले अपघात होऊन जीवित हानी होण्याची वाट पाहत आहात का ? अपघातात जीवित हानी झालेल्या व्यक्तीला ठेकेदार कंपनीच्या शेडवर किंवा आपल्या कार्यालयासमोर आणून दहन, दफन व समाधिस्त करायचे का ? सदर निवेदन हे गंभीर स्वरूपाचे असून याची तात्काळ दखल घेवून काम चालू करावे. ठेकेदार कंपनीला लेखी आदेश द्यावेत, अन्यथा क्रांती दिनी ९ ऑगस्ट रोजी आम्ही निवेदनावर सह्या करणारे दोघेजन अर्ध नघ्न होऊन सदर रोडच्या हद्दीत लोटांगण आंदोलन करू. तरी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन बांधकाम विभागाला प्रा. सुनिल पाखरे व अंबादास शेकडे यांनी दिले आहे.
Tags :

