पाथर्डीत 'या' प्रतिष्ठाणकडून रिक्षाचालकांना किराना व जिवनावश्यक साहित्याची मदत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 20 मे,2021
पाथर्डी तालुक्यातील अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून शहरात व आजूबाजूच्या खेड्यात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकांना एक महिना पुरेल एवढा किराणा व जीवनावश्यक साहित्याची मदत देण्यात आली. कोरोनामुळे मागील एक महिन्यापासून महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन असून प्रवाशी वाहतूक बंद आहे परिणामी रिक्षा चालवून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा चालकांना उपासमारीला तोंड द्यावे लागत होते. त्यांची होणारी परवड बंद होऊन कमीत कमी लॉकडाऊन उठे पर्यंत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटावा या उद्देशाने अभय आव्हाड यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही मदत केली. यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.बबन चौरे व शहरातील रिक्षा चालक उपस्थित होते